Husharmulga.com marashi saptarshi class 6 पाठ १: संतवाणी ( class 6 – Marathi Saptarshi )

पाठ १: संतवाणी ( class 6 – Marathi Saptarshi )

. शब्दार्थ आणि वाक्प्रचार (Vocabulary and Phrases)

  • गाथा: देवाच्या स्तुतीचे काव्य
  • अमूल्य: मौल्यवान
  • ओवी: संताचा पवित्र संदेश
  • गुणगान: प्रशंसा
  • कृतार्थ: आभारी
  • ठेवा: संपत्ती
  • घरोघरी: प्रत्येकाच्या घरात
  • हृदय: मन

  • वाक्प्रचार १ – साद घालणे: हाक देणे, आवाज देणे. (वाक्यात उपयोग: संकटाच्या वेळी आपण देवाला साद घालतो.)
  • वाक्प्रचार २ – कृतार्थ होणे: धन्य / समाधानी होणे. (वाक्यात उपयोग: ईश्वरचरणी कृतार्थ राहून सेवा करावी.)

खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा

१. पांडुरंगाला काय घातली आहे?

  • १) आवाज
  • २) साद (✓ योग्य पर्याय)
  • ३) साकडे
  • ४) आट

२. कोणाचे गुणगान गायचे आहे?

  • १) जनाचे
  • २) मनाचे
  • ३) संतांचे (✓ योग्य पर्याय)
  • ४) लोकांचे

३. ईश्वरचरणी कसे राहावे?

  • १) कृतार्थ (✓ योग्य पर्याय)
  • २) आश्रित
  • ३) विनीत
  • ४) आशावादी

मौखिक प्रश्न

प्रश्न: साद कोणाला घातली आहे?

उत्तर: साद पांडुरंगाला घातली आहे.

प्रश्न: गाथेत काय दिसले?

उत्तर: गाथेत विठ्ठल भक्ती दिसली.

प्रश्न: संतांचे बोल कसे आहेत?

उत्तर: संतांचे बोल अमूल्य आहेत.

एका वाक्यात उत्तरे लिहा

प्रश्न: ज्ञानेश्वरीतून घरोघरी काय पोहोचली?

उत्तर: ज्ञानेश्वरीतून घरोघरी भगवद्गीता पोहोचली.

प्रश्न: ‘गाथा’ कोणाची आहे?

उत्तर: गाथा तुकारामांची आहे.

प्रश्न: कोणाच्या ओव्यांना पांडुरंगाचा स्पर्श आहे?

उत्तर: जनाबाईच्या ओव्यांना पांडुरंगाचा स्पर्श आहे.

प्रश्न: विठ्ठल भक्तीचा मळा कोणी फुलवला?

उत्तर: विठ्ठल भक्तीचा मळा सावता माळी यांनी फुलवला आहे.

प्रश्न: खरोखरीची विठ्ठल भक्ती कोठे दिसते?

उत्तर: तुकारामांच्या गाथेत खरोखरीची विठ्ठल भक्ती दिसते.

सविस्तर उत्तरे लिहा

प्रश्न: या कवितेत कोणकोणत्या संतांचा आणि साहित्याचा उल्लेख आला आहे?

उत्तर: या कवितेत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई, सावता माळी, संत एकनाथ, संत नामदेव, संत सोपानदेव, आणि संत मुक्ताई या संतांचा उल्लेख आलेला आहे. तसेच ज्ञानेश्वरांची ‘ज्ञानेश्वरी’, तुकारामांची ‘गाथा’, आणि जनाबाईच्या ‘ओव्या’ या साहित्याचाही उल्लेख आहे.

प्रश्न: संतांचे बोल कसे आहेत? का?

उत्तर: संतांचे बोल अमूल्य असा ठेवा आहेत. आज हजारो वर्षे झाली तरी त्यांच्यासारखे ईश्वरचरणी कृतार्थ होऊन सेवा करणारे संत पुन्हा झाले नाहीत. सगळ्या संतांच्या हृदयात हरिचा वास आहे, त्यामुळे त्यांच्या ओव्या भक्तिरसात न्हाऊन निघाल्या आहेत.

खालील पद्यांशाच्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा

प्रश्न: विठ्ठल नामात कोण रंगले आहेत?

उत्तर: विठ्ठल नामात संत एकनाथ, संत नामदेव, संत सोपान, आणि संत मुक्ताई रंगले आहेत.

प्रश्न: या जगाला काय सांगितले?

उत्तर: हृदयात हरिचा वास असतो, असे या जगाला सांगितले आहे.

प्रश्न: संतांनी काय संदेश दिला आहे?

उत्तर: संतांनी ईश्वरचरणी कृतार्थ राहून सेवा करण्याचा संदेश दिला आहे.

अधिकचे प्रश्न

प्रश्न: पांडुरंगाला काय घातली आहे?

उत्तर: पांडुरंगाला साद घातली आहे.

प्रश्न: कोणाचे गुणगान गायचे आहे?

उत्तर: संतांचे गुणगान गायचे आहे.

प्रश्न: ईश्वरचरणी कसे राहावे?

उत्तर: ईश्वरचरणी कृतार्थ राहावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

पाठ २ – महर्षी वाल्मिकीपाठ २ – महर्षी वाल्मिकी

शब्दार्थ निबिड: गर्द अरण्य: जंगल मध्यावर: मध्यभागी धन दौलत: संपत्ती महान: मोठे क्रूर: दुष्ट अनपेक्षित: अपेक्षा नसलेले भागीदार: सहभागी वारुळ: ant hill जप: स्मरण तपस्वी: साधू चेहरा उतरणे: उदास होणे

पाठ ३ शिवा काशीद ( इयत्ता ६ वी सप्तर्षी )पाठ ३ शिवा काशीद ( इयत्ता ६ वी सप्तर्षी )

शब्दार्थ नाभिक: न्हावी नक्कल: छबी कारकिर्द: era महाद्वार: Main Entrance वेढा: चारही बाजूने बंद राजवस्त्रे: राजेशाही कपडे शार्दूल: सिंह पवित्र: निर्मळ खोपटे: झोपडी बिनशर्त: विनाअट तलवार: खड्ग निवडक: मोजके मौखिक