प्र.1. खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडून खूण करा.
क) अखिल भारतीय नेव्ही जलतरण स्पर्धेचे निमित्त काय होते ?
(1) सिविलियन डे 2) नेव्ही डे 3) एअरफोर्स डे 4) आर्मी डे)
उत्तर: 2) नेव्ही डे
ख) 19 वर्षांखालील मुलांच्या स्पर्धा कोठे होणार होत्या ?
(1) सोलापूर 2) मुंबई 3) नागपूर 4) कुलाबा)
उत्तर: 3) नागपूर
ग) गोकूळ सरांनी चार्ट टाईम किती भागांमध्ये विभागला?
(1) 6 2) 12 3) 7 4) 15)
उत्तर: 4) 15
प्र.2. एका वाक्यात उत्तरे लिहा.
क) शुभम व इतर स्विमर स्टार्टिंग पॉईंटला आल्यावर त्यांना कोणत्या सूचना दिल्या ? उत्तर: त्यांना सुरक्षिततेच्या आणि स्पर्धेच्या बाबतीतील सूचना पुन्हा देण्यात आल्या.
ख) पोहण्यासाठी समुद्राचे पाणी कसे असते ?
उत्तर: पोहण्यासाठी समुद्राचे पाणी जड आणि अथांग, निळे, शांत असते.
- नागपूरसाठी शुभमचे प्रशिक्षक कोण होते ?
उत्तर: नागपूरसाठी शुभमचे प्रशिक्षक गोकूळ सर होते.
- नागपूरला पोहोचल्यावर शुभमला कसे वाटू लागले ?
उत्तर: सोबत कोणीही नसल्यामुळे शुभमला एकदम एकटे वाटू लागले.
- शुभमच्या बाबांनी त्याला कसा धीर दिला ?
उत्तर: शुभमच्या बाबांनी त्याला जवळ घेऊन धीर दिला आणि “जिंकणे आणि हरणे सुरूच राहणार, तू तुझे बेस्ट देण्याचा प्रयत्न कर” असे सांगून नवी उमेद जागवली.
प्र.3. सविस्तर उत्तरे लिहा.
क) ‘जर आणि तर’ या शब्दांना स्पर्धेच्या जगात आणि आयुष्यात काही स्थान नसते’ या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.
उत्तर: आयुष्यात आणि स्पर्धेत आपण भूतकाळातल्या चुकांवर ‘असे झाले असते तर तसे झाले असते’ असा विचार करत बसण्यापेक्षा, वास्तवाचा स्वीकार करून पुढे जाणे महत्त्वाचे असते.
- शुभम उदास झाल्यावर त्याचे बाबा त्याला कशी उमेद द्यायचे ?
उत्तर: त्याचे बाबा त्याला म्हणायचे, “अरे, हे स्पर्धांचे जग आहे. इथे जिंकणे आणि हरणे सुरूच राहणार; पण तू कधी थांबू नकोस. तुझे बेस्ट देण्याचा प्रयत्न कर. एक दिवस तू नक्की यशस्वी होशील.” अशा प्रकारे ते उमेद द्यायचे.
ग) या पाठाच्या आधारे तुमचे ‘शुभम वनमाळी’ विषयीचे काय मत आहे ते लिहा.
उत्तर: शुभम वनमाळी हा एक अतिशय जिद्दी, मेहनती आणि संकटांना न घाबरणारा जलतरणपटू आहे, ज्याला डोळ्यांच्या समस्येसारखे अडथळे असूनही तो खचून न जाता यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतो.
प्र.4. खालील गद्यांशाच्या आधारावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
- जलतरणपटूंना स्विमिंगसाठी वेगळा गॉगल कधी दिला जातो?
उत्तर: ज्या जलतरणपटूंना डोळ्यांचा नंबर असतो, त्यांच्यासाठी वेगळा स्विमिंगचा गॉगल दिला जातो.
- शुभमला वेगळा गॉगल न दिल्याने काय झाले ?
उत्तर: त्याला तो न दिल्याने त्याला काही दिसत नव्हते आणि त्यामुळे थोड्या अंतरानंतर तो भरकटत गेला.
ग) शुभमने कितवा क्रमांक पटकावला होता? उत्तर: शुभमने 4 था क्रमांक पटकावला होता.
भाषा विकास
प्र.1. विरुद्धार्थी शब्द लिहा.
(अयशस्वी, हलके, घाबरत, अननुभवी, बंधन, आळशी)
क) अनुभवी X अननुभवी
ख) मोकळीक X बंधन
ग) जड X हलके
घ) यशस्वी X अयशस्वी
ङ) बेधडक X घाबरत
च) उत्साही X आळशी
प्र.2. योग्य समानार्थी शब्द लिहा.
(कामना, एकाकी, जीवन, सागर, गट, दिन)
क) समुद्र -> सागर
ख) चमू -> गट
ग) आयुष्य -> जीवन
घ) दिवस -> दिन
ङ) इच्छा -> कामना
च) एकटे -> एकाकी
प्र.3. खालील क्रियापदांना इंग्रजी प्रतिशब्द लिहा.
क) पोहणे -> To swim
ख) सुरुवात होणे -> To start / To begin
ग) उडी मारणे -> To jump
घ) टिपणे -> To note / To capture
ङ) जागवणे -> To awaken / To arouse
च) थांबणे -> To stop
