शब्दार्थ

नाभिक: न्हावी

नक्कल: छबी

कारकिर्द: era

महाद्वार: Main Entrance

वेढा: चारही बाजूने बंद

राजवस्त्रे: राजेशाही कपडे

शार्दूल: सिंह

पवित्र: निर्मळ

खोपटे: झोपडी

बिनशर्त: विनाअट

तलवार: खड्ग

निवडक: मोजके

प्र.1. खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडून खूण करा.

क) शिवा मनाने कसा होता ?

(1) कठोर 2) निर्मळ 3) निग्रही 4) कोमल)

उत्तर: 2) निर्मळ

ख) महाराजांनी कोल्हापूर किती वर्षांनी जिंकले ?

(1) अडीचशे 2) साडेचारशे 3) दिडशे 4) साडेतीनशे)

 उत्तर: 4) साडेतीनशे

ग) वेढा कोणी घातला होता?

(1) सिद्दी जोहर 2) आदिलशाह 3) फाजल खान 4) बादल खान)

उत्तर: 1) सिद्दी जोहर

मौखिक प्रश्न

प्रश्न: शिवा काशीद कोण होता?

उत्तर: शिवा काशीद हा नाभिक (न्हावी) होता.

प्रश्न: शिवा कोठे राहायचा?

उत्तर: पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या नेवापूर गावात तो राहायचा.

प्रश्न: शिवा कोणासारखा दिसायचा?

उत्तर: शिवा शिवाजी महाराजांची नक्कल (त्यांच्यासारखा) दिसायचा.

एका वाक्यात उत्तरे लिहा

प्रश्न: शिवा काशीद कोणाकोणाची हजामत करीत असे?

उत्तर: पन्हाळगडावर येणाऱ्या-जाणाऱ्या सैनिकांची, किल्लेदाराची, सुभेदाराची, आणि सेनापतीची हजामत तो करीत असे.

प्रश्न: शिवाचा कोठे कोठे मुक्त वावर होता?

उत्तर: गडावर आणि पायथ्याशी दोन्हीकडे शिवाचा वावर होता.

प्रश्न: शिवा का सुखावायचा?

उत्तर: किल्ल्यावर सगळे त्याला शिवाजी महाराजांची नक्कल म्हणून चिडवायचे, त्याने मात्र तो मनातून खूप सुखावून जायचा.

प्रश्न: किती दिवसांमध्ये महाराजांनी पन्हाळगड जिंकून घेतला?

उत्तर: अवघ्या तीन दिवसांत महाराजांनी पन्हाळगड जिंकून घेतला.

प्रश्न: शिवाने महाराजांच्या पायावर लोळण घेतली तेव्हा महाराज शिवाला काय म्हणाले?

उत्तर: महाराजांनी त्याला धरून उठवले आणि म्हणाले, “शिवा, घाबरता का?”

सविस्तर उत्तरे लिहा

१) पाठाच्या आधारे किल्ले पन्हाळगडचा इतिहास लिहा.

२) महाराजांनी सिद्दी जोहरला माफीनामा कसा पाठवला?

उत्तर: महाराजांनी सिद्दी जोहरला बिनशर्त माफीनामा पाठवला. त्यात त्यांनी पन्हाळगड त्याच्या स्वाधीन करत असल्याचे लिहिले. या माफीनाम्यासोबत पांढरे निशाण असलेला शिलेदार व चार शिपाई होते.

३) सिद्दीच्या छावणीत शिवा काशीदसोबत काय घडले ते तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर: सिद्दीच्या सैनिकांनी शिवाला शिवाजी समजून पकडून छावणीत आणले. सिद्दी त्याच्याशी शिवाजी समजून बोलायला लागला. त्याला कैद केले गेले, तेवढ्यात तिथे फाजलखान आला आणि त्याने ओळखले की हे महाराज नाहीत. छावणीत हाहाकार माजला. सिद्दीच्या सैनिकांच्या तलवारी शिवाच्या शरीरातून आरपार गेल्या. ‘जय भवानी, जय शिवाजी, हरहर महादेव’ म्हणतच शिवाने प्राण सोडले.

प्र.3. सविस्तर उत्तरे लिहा.

उत्तर: पन्हाळगडाला बाराशे वर्षांचा इतिहास आहे. शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत हा किल्ला बांधण्यात आला. याच किल्ल्यावरून सम्राट अशोकाने शिक्षणाचा प्रसार केला. हा गड फारसा उंच नसून पसरट आहे आणि दक्षिणेचे हे महाद्वार होते.

ख) महाराजांनी सिद्दी जोहरला माफीनामा कसा पाठवला ? त्यात काय लिहिले होते ? उत्तर: महाराजांनी सिद्दी जोहरला माफीनामा पाठवला ज्यात त्यांनी पन्हाळगड त्याच्या स्वाधीन करत असल्याचे लिहिले होते. या माफीनाम्यासोबत पांढरे निशाण घेतलेला एक शिलेदार व चार शिपाई पाठवले होते.

ग) सिद्दीच्या छावणीत शिवा काशीदसोबत काय घडले, ते तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर: सिद्दीच्या सैनिकांनी शिवाला शिवाजी समजून पकडून छावणीत आणले. सिद्दी त्याच्याशी शिवाजी समजून बोलू लागला. तेवढ्यात तिथे फाजलखान आला आणि त्याने ओळखले की हे महाराज नाहीत. त्यानंतर छावणीत हाहाःकार माजला आणि सिद्दीच्या सैनिकांच्या तलवारी शिवाच्या शरीरातून आरपार गेल्या.

प्र.4. खालील गद्यांशाच्या आधारावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. राजवस्त्रे शिवाच्या हातात देऊन महाराज काय म्हणाले?

उत्तर: महाराज म्हणाले, “आता मागे हटू नकोस. हे कपडे घाल. मलाच माझे प्रतिबिंब पाहू दे.”

2. शिवाचे रूप बघून महाराजांनी शिवाला कोणती योजना सांगितली ?

उत्तर: महाराज म्हणाले, “आजपासून तू शिवाजी ! आज रात्रीच काम फत्ते करायचे. मी आणि सहाशे मावळे पावनगडाच्या दिशेने निघणार. आम्ही पुढे गेलो की तुम्ही आणि काही मावळे निघा.”

3. सिद्दीच्या छावणीत शिवाजी पळाल्याची बातमी कळल्यावर काय झाले ?

उत्तर: सिद्दीला बातमी कळली आणि त्याच्या सैनिकांनी शिवाला शिवाजी समजून पकडून छावणीत आणले.

भाषा विकास

प्र.1. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

(राजेशाही, तळ, किल्ला, न्हावी, छबी, सिंह)

क) शार्दूल -> सिंह

ख) गड -> किल्ला

ग) राजवस्त्रे -> राजेशाही

घ) नाभिक -> न्हावी

ङ) छावणी -> तळ

च) प्रतिबिंब -> छबी

प्र.2. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

(पायथा, दुख, आधी, रिमझिम, सरसकट, परराज्य)

क) माथा X पायथा

ख) नंतर X आधी

ग) सुख X दुख

घ) निवडक X सरसकट

ङ) मुसळधार X रिमझिम

च) स्वराज्य X परराज्य

प्र.3. खालील वाक्प्रचारांचे वाक्यात उपयोग करा.

क) आगळीक घडणे -> माझ्या हातून मोठी आगळीक घडली आहे.

ख) अवलोकन करणे -> महाराजांनी गडाखालील परिसराचे अवलोकन केले.

ग) भितीने गाळण उडणे -> समोर वाघ पाहताच माझी भितीने गाळण उडाली.

घ) कानांवर विश्वास न बसणे -> ती आनंदाची बातमी ऐकून माझ्या कानांवर विश्वासच बसेना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *