शब्दार्थ
निबिड: गर्द
अरण्य: जंगल
मध्यावर: मध्यभागी
धन दौलत: संपत्ती
महान: मोठे
क्रूर: दुष्ट
अनपेक्षित: अपेक्षा नसलेले
भागीदार: सहभागी
वारुळ: ant hill
जप: स्मरण
तपस्वी: साधू
चेहरा उतरणे: उदास होणे
रुपांतर: परिवर्तन होणे
मागोवा घेणे: पाठलाग करणे
सकारात्मक बदल घडणे: चांगला बदल होणे
मौखिक प्रश्न
प्रश्न: गावात कोण आले होते?
उत्तर: गावात महर्षी नारदमुनी आले होते.
प्रश्न: दूरवरून काय ऐकू येत होते?
उत्तर: दूरवरून रामनाम ऐकू येत होते.
एका वाक्यात उत्तरे लिहा
प्रश्न: वाल्या कोळी वाटसरूंना काय करायचा?
उत्तर: वाल्या येणाऱ्या-जाणाऱ्या वाटसरूंना लुटायचा आणि त्यांचा छळ करायचा.
प्रश्न: गावकऱ्यांनी महर्षी नारदमुनींना काय सांगितले?
उत्तर: गावकऱ्यांनी महर्षी नारदमुनींना अरण्य व वाल्या कोळ्याविषयी सांगून अरण्यातून जाऊ नये असे सांगितले.
प्रश्न: वाल्या कोळ्याच्या हातात काय होती?
उत्तर: वाल्या कोळ्याच्या हातात कुऱ्हाड होती.
प्रश्न: नारदमुनींनी वाल्याला काय करायला सांगितले?
उत्तर: नारदमुनींनी वाल्याला राम जप करायला सांगितले.
प्रश्न: वाल्या जप करायला कोठे निघून गेला?
उत्तर: वाल्या जप करायला निबिड अरण्यात निघून गेला.
सविस्तर उत्तरे लिहा
सविस्तर उत्तरे लिहा (Answer in Detail)
(क) अरण्यात महर्षी नारदमुनींना अडवून वाल्या काय म्हणाला?
उत्तर: अरण्यात महर्षी नारदमुनींना अडवून वाल्याने त्यांच्याकडे जे काही आहे ते मागितले. त्यावर नारदमुनींने त्याला उपदेश दिला आणि तुझ्या या पापात तुझी पत्नी आणि मुले भागीदार आहेत का हे विचारायला सांगितले.
(ख) रामनामाविषयी नारदमुनी आणि वाल्या कोळी यांच्यामध्ये काय बोलणे झाले?
उत्तर: वाल्या कोळ्याला जेव्हा समजलं की त्याची पत्नी आणि मुलं त्याच्या पापात भागीदार नाहीत त्यावेळेस तो उदास झाला. नारदमुनींनी त्याला रामनामाचा जप करायला सांगितलं होतं. पण त्याला मरा आणि मार याशिवाय काहीच येत नव्हते असे सांगितले. सांगितल्यावर नारदमुनींनी त्याला ‘मरा मरा’ असे बोलण्यास सांगितले.
३) कालांतराने महर्षी नारदमुनींना वाल्या कोळी कोठे दिसला?
उत्तर: तप करायला वाल्या निबिड अरण्यात निघून गेला. अनेक वर्षांनी नारदमुनी त्याच अरण्यात जात असताना त्यांना दुरून रामनामाचा जप ऐकू आला. आवाजाच्या दिशेने जाताना प्रचंड मोठ्या मुंग्यांच्या वारुळामधून आवाज येतांना जाणवला. वारूळ फोडून बघितल्यावर आतमध्ये एक तपस्वी त्यांना दिसला. त्यांनी वाल्या कोळ्याला ओळखले आणि त्याच वेळेस वाल्या ‘वाल्मिकी’ झाला असे ते त्याला म्हणाले.
(4) खालील गद्यांशाच्या आधारवर विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा
प्रश्न: वाल्याने पत्नीला कोणता प्रश्न विचारला?
उत्तर: “या धनामध्ये तुझा वाटा असतो, तसा मी केलेल्या पापातही तुझा वाटा आहे ना?” असा प्रश्न विचारला.
प्रश्न: त्यावर त्याच्या पत्नीने काय उत्तर दिले?
उत्तर: “नाही, अजिबात नाही. हा मार्ग तुमचा आहे त्यामुळे त्याचे पाप फक्त तुमचेच! माझे किंवा माझ्या मुलाचे मुळीच नाही,” असे उत्तर दिले.
प्रश्न: पत्नीचे उत्तर ऐकून वाल्या कोळ्याला काय वाटले?
उत्तर: वाल्या अत्यंत दुःखी झाला.
प्रश्न: अरण्यात महर्षी नारदमुनींना अडवून वाल्याने काय मागितले?
उत्तर: अरण्यात महर्षी नारदमुनींना अडवून वाल्याने त्यांच्याकडे जे काही आहे ते मागितले.
