छत्रपती शिवाजी महाराज रत्नपारखी होते. महाराजांकडे अनेक रत्ने होती. महाराज कलागुणांना पारखत असत. असेच एक रत्न म्हणजे बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक स्वराज्यासाठी हेरगिरी करायचे. बहिर्जींना उत्तम प्रकारे मराठी, हिंदी व उर्दू येत होते. स्वराज्यात हजारो गुप्तहेर होते.
बहिर्जी लहानपणापासूनच वेषांतर करण्यात तरबेज होते. ते इतके अचूक वेषांतर करायचे की त्यांचे निरीक्षण अतिशय बारकाईने असायचे. त्यांनी केलेल्या वेषांतरात दोष काढणे कठीण होते. त्यांची ही कला महाराजांच्या नजरेत भरली. महाराजांनी बहिर्जींना स्वराज्याच्या कामात रुजू करून घेतले.
त्यांची परीक्षा घेण्याकरिता महाराजांनी त्यांना खेळणा गडाची माहिती काढण्याची कामगिरी सोपवली. बहिर्जी फकिराचा वेश घेऊन विशाळगडावर गेले आणि तिथल्या पहारेकऱ्यांशी उर्दूत बोलून “दर्ग्यावर चादर चढवायची आहे,” असे सांगून गडावर शिरकाव केला.
एका वाक्यात उत्तरे लिहा
१. बहिर्जींना कोणत्या भाषा अवगत होत्या?
उत्तर: मराठी, हिंदी आणि उर्दू या भाषा त्यांना अवगत होत्या.
२. बहिर्जींची परीक्षा घेण्यासाठी महाराजांनी कोणता गड निवडला?
उत्तर: परीक्षा घेण्यासाठी महाराजांनी खेळणा गड निवडला.
३. बहिर्जींची नेमणूक कोठे करण्यात आली?
उत्तर: बहिर्जींची नेमणूक स्वराज्याच्या कामात (हेरखात्यात) करण्यात आली.
४. कोणकोणते व्यापारी सुरतेतून व्यापार करीत?
उत्तर: इराणी, बगदादी, अरब, खोजा आणि अफगाणी हे व्यापारी सुरतेतून व्यापार करीत.
५. हाक मारणे म्हणजे काय?
उत्तर: शत्रुपक्षाचा हेर जंगलातून खलिता घेऊन जात असताना त्याला अडवून त्याच्याकडून माहिती काढण्याच्या पद्धतीला ‘हाक मारणे’ म्हणत होते.
सविस्तर उत्तरे लिहा
१. खेळणा गडाची माहिती लिहा.
उत्तर: पाठाच्या आधारे, त्या वेळेस असलेल्या खेळणा गडाला एक चोर दरवाजा आणि गुप्त वाट होती. त्या गडावर शंभर-दीडशे आदिलशाही सैनिक होते. गडावरचा दारूगोळा संपत आला होता, अशी माहिती बहिर्जींनी मिळवली.
२. बहिर्जींचे व्यक्तिचित्र रेखाटा.
उत्तर: बहिर्जींची एक कला उत्तम होती. चेहऱ्यावरचे भाव ते प्रसंगानुसार बेमालूमपणे बदलत असत. ते केव्हा कोणते सोंग आणतील हे सांगता येत नसे. ते स्वतः हरहुन्नरी होते. त्यांची कल्पना अफाट होती आणि त्यांच्या अंगी अनेक गुण होते. ते साधू, फकीर, संत, वासुदेव, भिकारी असे वेषांतर उत्तम करीत असत. त्यांची निरीक्षणशक्ती प्रचंड होती. ते अगदी बेमालूम वेषांतर करत असल्याने पाहणाऱ्याला बहिर्जींना ओळखता येत नसे.
३. बहिर्जी हाक कशी मारायचे, ते पाठाच्या आधारे लिहा.
उत्तर: बहिर्जींची हाक मारण्याची विशिष्ट पद्धत होती. शत्रुपक्षाचा हेर जंगलातून खलिता घेऊन जायचा तेव्हा ते दरोडेखोरांचा वेष धारण करून त्याला जंगलात लुटायचे. त्याचा खलिता घेऊन, वाचता येत नसल्याचे सोंग करून खलिता परत करायचे. त्यामुळे शत्रुपक्षाचा हेर खुश होऊन निश्चिंत राहायचा.
वाक्यात उपयोग करा
१. तरबेज असणे
अर्थ: पटाईत असणे.
वाक्य: मी अभ्यासात तरबेज आहे.
२. शिरकाव करणे
अर्थ: प्रवेश मिळवणे.
वाक्य: शिवाजी महाराजांनी मुघलांच्या राज्यात शिरकाव केला.
३. सोंग वठवणे
अर्थ: नक्कल करणे.
वाक्य: सोहन मोहनचे सोंग वठवतो.
४. बेमालूमपणे करणे
अर्थ: हुबेहूब करणे.
वाक्य: छकुली आपल्या आई-बाबांची बेमालूमपणे नक्कल करते.
५. दोन हात करणे
अर्थ: सामना करणे.
वाक्य: शिवाजी महाराज मुघलांसोबत दोन हात करत होते.
६. चोख पार पाडणे
अर्थ: हुशारीने / योग्यरित्या कार्य करणे.
वाक्य: बहिर्जी नाईक आपले काम चोख पार पाडत होते.
