Husharmulga.com इयत्ता ८ वी सप्तर्षी पाठ – ४ : माय मराठी

पाठ – ४ : माय मराठी

चोखोबाच्या घामात मी, सावतामाळ्याच्या शेतात मी, कुंभाराच्या मातीत मी, नामदेवांच्या रचनेत मी, एकनाथांच्या भारुडात, मुक्ताईच्या ताटीत मी आणि ज्ञानोबांच्या मराठीत मी.

शब्दार्थ

  • वाळवंट — चंद्रभागेचे वाळवंट / नदीकाठची वाळू
  • रण — युद्धभूमी
  • देऊळ — मंदिर
  • मळा — शेत
  • मृदा — माती
  • निरनिराळी — वेगवेगळी
  • रचना — निर्मिती
  • ताटी — झोपडीचे दार

एका शब्दात उत्तरे लिहा

१. मी म्हणजे कोण?

उत्तर: माय मराठी.

२. ‘वाळवंट’ म्हणजे काय?

उत्तर: चंद्रभागेचे वाळवंट.

३. मंदिर कोणाचे आहे?

उत्तर: आई भवानीचे आहे.

एका वाक्यात उत्तरे लिहा

१. ‘ओवी’ कोणाची आहे?

उत्तर: ‘ओवी’ बहिणाबाईंची आहे.

२. गाथा कोणी लिहिली आहे?

उत्तर: गाथा संत तुकारामांनी लिहिली आहे.

३. जनाबाईंचे काय आहे?

उत्तर: जनाबाईंचे अभंग आहेत.

४. नामदेवांची काय आहे?

उत्तर: नामदेवांची रचना आहे.

५. ज्ञानोबा म्हणजे कोण?

उत्तर: ज्ञानोबा म्हणजे संत ज्ञानेश्वर.

सविस्तर उत्तरे लिहा

१. ‘माय मराठी’ या कवितेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर: ‘माय मराठी’ ही कविता मराठीची व्याप्ती सांगणारी आहे. मराठी भाषा किती महान आहे आणि ती कुठपर्यंत पोहोचली आहे, ते कवितेत सांगितले आहे. संतांनी मराठी भाषेला आपल्या अभंगांत, ओव्यांत आणि रचनांत स्थान दिले.

२. कोणकोणत्या संतांनी मराठीसाठी योगदान दिले आहे, ते कवितेच्या आधारे लिहा.

उत्तर: संत बहिणाबाईंच्या ओव्या, संत तुकारामांची गाथा, संत जनाबाईंचे अभंग, संत चोखोबांचा मेळा आणि संत गोरा कुंभाराच्या मातीत तुडवताना मराठी घामली. संत नामदेवांच्या रचनेत आणि संत एकनाथांच्या भारुडात मराठी आहे.

वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा

माया माथ्यावर असणे

अर्थ: शिखरावर असणे.

संदर्भ व स्पष्टीकरण

ओळी:
“बहिणाबाईंच्या ओवीत मी, तुकोबांच्या गाथेत मी, चंद्रभागेच्या वाळवंटात मी, आई भवानीच्या मंदिरात मी.”

संदर्भ: वरील ओळी ‘माय मराठी’ या कवितेतील आहेत. या कवितेत संतांच्या ज्या वस्तूंमध्ये मराठी आहे, त्या वस्तूंचे वर्णन केले आहे.

स्पष्टीकरण: या ओळींतून मराठी भाषेचा संतसाहित्याशी असलेला जवळचा संबंध स्पष्ट होतो. बहिणाबाईंच्या ओवीत, तुकोबांच्या गाथेत, चंद्रभागेच्या वाळवंटात आणि आई भवानीच्या मंदिरात मराठीचे अस्तित्व जाणवते. मराठी भाषा संतांच्या विचारांतून आणि त्यांच्या साहित्यकृतींतून सर्वदूर पोहोचली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

पाठ – २ : काळ आला होता; पण…पाठ – २ : काळ आला होता; पण…

शब्दार्थ एका वाक्यात उत्तरे लिहा १. राजा परीक्षित कशासाठी प्रसिद्ध होता? उत्तर: राजा परीक्षित प्रजाहितदक्ष आणि दानशूरपणासाठी प्रसिद्ध होता. २. राजा परीक्षिताकडे काय होते? उत्तर: राजा परीक्षिताकडे अफाट ज्ञान व

पाठ – ३ : स्वराज्याचा शिलेदारपाठ – ३ : स्वराज्याचा शिलेदार

छत्रपती शिवाजी महाराज रत्नपारखी होते. महाराजांकडे अनेक रत्ने होती. महाराज कलागुणांना पारखत असत. असेच एक रत्न म्हणजे बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक स्वराज्यासाठी हेरगिरी करायचे. बहिर्जींना उत्तम प्रकारे मराठी, हिंदी व

१ . संतांचा मेळा ( सौ. विभावरी रास्ते )१ . संतांचा मेळा ( सौ. विभावरी रास्ते )

Taken from the workbook of Mr. Reeansh Polojwar VIII B VidyahVihar Convent शब्दार्थ (Word meanings)द्वार :दरवाजा doorमंदिर : देऊळ templeन्यास :स्थापन establishमहती : प्रसिद्धी fameअपार : असीम – extremeअमृत :