Husharmulga.com marashi saptarshi class 6 5. या झोपडीत माझ्या… इयत्ता ६ marathi सप्तर्षी

5. या झोपडीत माझ्या… इयत्ता ६ marathi सप्तर्षी

5. या झोपडीत माझ्या…

प्र.1. खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडून खूण करा.

क) कवी कोठे पडावयास सांगत आहे ?

(1) बिछान्यात 2) अंथरुणात 3) भूमीवर 4) चटईवर)

उत्तर: 3) भूमीवर

ख) नित्य कोणते गायन करायचे आहे?

(1) सुरांचे 2) गाण्याचे 3) प्रभुनामाचे 4) संगीताचे)

उत्तर: 3) प्रभुनामाचे

ग) झोपडीच्या दाराला काय नाही लावले आहे?

(1) कुलूपे 2) दोऱ्या 3) कोयंडे 4) कड्या)

उत्तर: 2) दोऱ्या

प्र.2. एका वाक्यात उत्तरे लिहा.

क) भूमीवर पडून कोणाकडे पाहावे ?

उत्तर: भूमीवर पडून ताऱ्यांकडे पाहावे.

ख) महालात काय काय सुरक्षा असते ?

उत्तर: महालात पहारे आणि तिजोऱ्या असतात.

ग) एवढी सुरक्षा असूनही महालात काय होण्याची भीती असते ?

उत्तर: एवढी सुरक्षा असूनही महालात चोऱ्या होण्याची भीती असते.

घ) महालात जाताना कोणता शब्द ऐकू येतो?

उत्तर: महालात जाताना ‘मज्जाव’ शब्द ऐकू येतो.

ङ) झोपडीत कोठे झोपायला कवीला आवडते ?

उत्तर: झोपडीत जमिनीवर (भूमीवर) झोपायला कवीला आवडते.

प्र.3. सविस्तर उत्तरे लिहा.

क) महालामध्ये कोणकोणत्या सोयीसुविधा असतात ?

उत्तर: महालामध्ये मऊ बिछाने, कंदील, शामदाने, पहारे आणि तिजोऱ्या अशा अनेक सोयीसुविधा असतात.

ख) झोपडीत कोणते सुख आहे, असे कवीला वाटते ?

उत्तर: झोपडीत भीती नाही, कोणालाही मज्जाव नाही, कुणावरही कसला बोजा नाही आणि सदा शांती विराजत आहे, हे सुख झोपडीत आहे असे कवीला वाटते.

प्र.4. खालील पद्यांशाच्या आधारावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

  • झोपडीत येताना कोणाला बोजा का वाटणार नाही?

उत्तर: कारण तिथे येण्या-जाण्यासाठी कोणालाही मज्जाव नाही, कोणीही सुखाने येऊ आणि जाऊ शकते, म्हणून कोणावर बोजा वाटणार नाही.

  • झोपडीत कायम काय विराजते आहे?

उत्तर: झोपडीत कायम शांती विराजते आहे.

  • कवीच्या सुखाचा हेवा कोणाला वाटणार आहे?

उत्तर: कवीच्या सुखाचा हेवा देवेंद्र (इंद्र) यालाही वाटणार आहे (देवेंद्र तोही लाजे).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

पाठ २ – महर्षी वाल्मिकीपाठ २ – महर्षी वाल्मिकी

शब्दार्थ निबिड: गर्द अरण्य: जंगल मध्यावर: मध्यभागी धन दौलत: संपत्ती महान: मोठे क्रूर: दुष्ट अनपेक्षित: अपेक्षा नसलेले भागीदार: सहभागी वारुळ: ant hill जप: स्मरण तपस्वी: साधू चेहरा उतरणे: उदास होणे

पाठ १: संतवाणी ( class 6 – Marathi Saptarshi )पाठ १: संतवाणी ( class 6 – Marathi Saptarshi )

. शब्दार्थ आणि वाक्प्रचार (Vocabulary and Phrases) खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा १. पांडुरंगाला काय घातली आहे? २. कोणाचे गुणगान गायचे आहे? ३. ईश्वरचरणी कसे राहावे? मौखिक प्रश्न प्रश्न: साद

7. मला लाट व्हायचंय! Class 6 Marathi Saptarshi7. मला लाट व्हायचंय! Class 6 Marathi Saptarshi

प्र.1. खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडून खूण करा. क) अखिल भारतीय नेव्ही जलतरण स्पर्धेचे निमित्त काय होते ?  (1) सिविलियन डे 2) नेव्ही डे 3) एअरफोर्स डे 4) आर्मी डे)