Husharmulga.com marashi saptarshi class 6 4. निसर्ग समृद्ध आंबोली घाट

4. निसर्ग समृद्ध आंबोली घाट

प्र.1. खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडून खूण करा.

क) रस्ता ओलाचिंब कशामुळे झाला आहे?

(1) रस्त्यावर पाणी सांडले. 2) रंगपंचमी होती. 3) पावसाची सर येऊन गेली. 4) दव पडले होते.)

उत्तर: 3) पावसाची सर येऊन गेली.

ख) माही कोकणात कोठे चालली होती?

(1) फिरायला 2) गावाला 3) अभ्यासाला 4) समुद्रकिनारी)

उत्तर: 2) गावाला

ग) कोकणात कोणत्या मार्गाने जायचे ठरले?

(1) सोलापूर 2) सातारा 3) कोल्हापूर 4) ताम्हिणी घाट)

 उत्तर: 3) कोल्हापूर

प्र.2. एका वाक्यात उत्तरे लिहा.

क) पावसाची सर येऊन गेल्याने काय झाले?

उत्तर: पावसाची सर येऊन गेल्याने आसपासचे वृक्ष न्हाऊन निघाले आहेत व रस्ता ओलाचिंब झाला आहे.

ख) नागमोडी रस्ता काय दाखवतो आहे?

उत्तर: नागमोडी रस्ता प्रत्येक वळणावर निसर्गाचे आविष्कार दाखवतो आहे.

ग) माहीचे बाबा गावाला नेहमीच्या रस्त्याने का नाही गेले?

उत्तर: नेहमीच्या मार्गावर खूपच वाहतूक आहे असे कळल्यावर ते नेहमीच्या रस्त्याने नाही गेले.

घ) ‘करवंदाची जाळी’ म्हणजे काय ?

उत्तर: ‘करवंदाची जाळी’ म्हणजे करवंदांची दाट झाडी होय.

ङ) येथे सगळ्यात मोठा धबधबा कोणता आहे ?

उत्तर: पारपोली इथला धबधबा सर्वात मोठा आहे.

प्र.3. सविस्तर उत्तरे लिहा.

क) आंबोली घाटाची वैशिष्ट्ये कोणती आहेत ?

उत्तर: आंबोली घाटाला साधारण शंभर वर्षे झाली आहेत तरीही हा घाट सुरक्षित आहे. इथली जंगले खूप दाट आहेत ही ह्या घाटाची वैशिष्ट्ये आहेत.

ख) आंबोली घाटात कोणकोणती पर्यटनस्थळे आहेत?

उत्तर: पारपोली व नांगरतास धबधबा, हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान, महादेव गड, कावळे साद, नट, सावित्री, सनसेट पॉईंट आणि महादेवाचे पुरातन मंदिर ही पर्यटनस्थळे आहेत.

ग) माहीच्या बाबांनी ट्रेकींगची योजना का ठरवली ?

उत्तर: घाटामध्ये खूप ट्रेकर्स दिसले, ते बघून बाबांना मुलांच्या ट्रेकींग प्रेमाची आठवण झाली आणि त्यांनी पुढच्या वेळी मित्र-मैत्रिणींसोबत इथे ट्रेकींगला येण्याची योजना ठरवली.

प्र.4. खालील गद्यांशाच्या आधारावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

  • माहीच्या कुटुंबाने जंगलात काय केले?

 उत्तर: त्यांनी जंगलातून मनमुराद भटकंती केली आणि करवंदाची जाळी पाहिली.

  • कावळे सादला कोणती मजा आली ?

उत्तर: तिथे आपल्या आवाजाचे पडसाद उमटतात, नाव उच्चारले तर ते चार वेळा ऐकू आले, याची मजा आली.

  • महादेवाचे मंदिर कोठे आहे आणि तेथे यात्रा कधी भरते ?

उत्तर: महादेवाचे मंदिर हिरण्यकेशी नदीच्या उगमस्थानी आहे आणि इथे महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा भरते.

भाषा विकास

प्र.1. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

क) निसर्ग -> सृष्टी

ख) जंगल -> अरण्य

ग) वृक्ष -> झाड

घ) मंदिर -> देऊळ

ङ) पर्यटक -> यात्री

च) आविष्कार -> चमत्कार

प्र.2. खालील वाक्यांचे काळ ओळखा.

क) रिमझिम पाऊस पडत आहे. -> वर्तमानकाळ

ख) रस्ता ओलाचिंब होता. -> भूतकाळ

ग) ढग दाटून आले आहेत. -> वर्तमानकाळ

घ) मुसळधार पाऊस येईल. -> भविष्यकाळ

ङ) सोसाट्याचा वारा सुटेल. -> भविष्यकाळ

प्र.3. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. (क्लेशदायक, उशिरा, द्वेष, सुका, शहर, असुरक्षित)

क) ओला X सुका

ख) प्रेम X द्वेष

ग) गाव X शहर

घ) लवकर X उशिरा

ङ) सुरक्षित X असुरक्षित

च) आल्हाददायक X क्लेशदायक

व्याकरण – अव्यय (स्वाध्याय)

प्र.1. खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य अव्यये लिहा.

क) अरे वा! खूप सुंदर चित्र!

ख) रिमझिम पाऊस पडतोय !

ग) तो उंच आहे पण जाड नाही.

घ) छत्रपती शिवाजी महाराज गडावर चढले.

ङ) बापरे! किती जोरात आपटला तो !

च) तू तरी जा किंवा मी तरी जातो.

छ) बाहेर खूप आवाज आहे.

ज) मी येणारच नव्हतो; कारण मला बोलावले नव्हते.

झ) उंदीर फ्रिजवर चढला.

ट) पोपट पिंजऱ्या आहे.

प्र.2. खालील अव्यये योग्य रकान्यात लिहा.

(समोर, वारंवार, साठी, कारण, नेहमी, की, देखील, आणि, शाब्बास, अरेच्चा, वाह)

क्रियाविशेषणे: वारंवार, नेहमी

शब्दयोगी: समोर, साठी, देखील

उभयान्वयी: कारण, की, आणि

केवलप्रयोगी: शाब्बास, अरेच्चा, वाह

वाक्यप्रकार (स्वाध्याय)

प्र.1. खालील वाक्यांचे रूपांतर करा.

क) आभाळाचे रंग सुंदर आहेत. (उद्‌गारार्थी करा).

 -> किती सुंदर आहेत आभाळाचे रंग!

ख) तू असे वागायला नको होतेस. (प्रश्नार्थक करा).

-> तू असे वागायला हवे होतेस का?

ग) मी जेवू का? (विधानार्थी करा). -> मी जेवणार आहे.

घ) तू अभ्यासाला बसशील का आता ? (आज्ञार्थी करा). -> तू आता अभ्यासाला बस.

प्र.2. खालील प्रकारांची दोन उदाहरणे लिहा.

  • क) विधानार्थी वाक्य -> १. मी अभ्यास करतो. २. पक्षी आकाशात उडतात.
  • ख) प्रश्नार्थी वाक्य -> १. तू केव्हा आलास? २. तुझे नाव काय आहे?
  • ग) उद्‌गारार्थी वाक्य -> १. अरे बापरे! केवढा मोठा साप! २. शाब्बास! छान खेळलास.
  • घ) आज्ञार्थी वाक्य -> १. मुलांनो, रांगेत उभे राहा. २. दरवाजा बंद कर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

6. हुताशनी पौर्णिमा Class 6 Marathi Saptarshi6. हुताशनी पौर्णिमा Class 6 Marathi Saptarshi

प्र.1. खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडून खूण करा. क) हिरण्यकशिपू कोणत्या वंशाचा होता ?  (1) देव 2) मानव 3) राक्षस 4) यक्ष) उत्तर: 3) राक्षस ख) हिरण्यकशिपूच्या बहिणीचे नाव काय

7. मला लाट व्हायचंय! Class 6 Marathi Saptarshi7. मला लाट व्हायचंय! Class 6 Marathi Saptarshi

प्र.1. खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडून खूण करा. क) अखिल भारतीय नेव्ही जलतरण स्पर्धेचे निमित्त काय होते ?  (1) सिविलियन डे 2) नेव्ही डे 3) एअरफोर्स डे 4) आर्मी डे)

पाठ ३ शिवा काशीद ( इयत्ता ६ वी सप्तर्षी )पाठ ३ शिवा काशीद ( इयत्ता ६ वी सप्तर्षी )

शब्दार्थ नाभिक: न्हावी नक्कल: छबी कारकिर्द: era महाद्वार: Main Entrance वेढा: चारही बाजूने बंद राजवस्त्रे: राजेशाही कपडे शार्दूल: सिंह पवित्र: निर्मळ खोपटे: झोपडी बिनशर्त: विनाअट तलवार: खड्ग निवडक: मोजके प्र.1.