Husharmulga.com इयत्ता ५ सप्तर्षी (मराठी)class 5 saptarshi ( Marathi) पाठ २: मुंबईचा किनारा स्वाध्याय

पाठ २: मुंबईचा किनारा स्वाध्याय

Spread the love

इयत्ता ५ वी सप्तर्षी

पाठ २: मुंबईचा किनारा

मौखिक कौशल्य

प्र.१) मुंबईच्या किनाऱ्याचे नाव काय आहे?

उत्तर: मुंबईच्या किनाऱ्याचे नाव ‘मरीन ड्राईव्ह’ आहे.

प्र.२) वर आकाश कसे आहे ?

उत्तर: वरचे आकाश अनंत आहे.

प्र.३) मुंबई कोणाची आई आहे?

उत्तर: कुठूनही आलेल्या शेकडो लोकांची मुंबई आता आई आहे.

उपयोजित लेखन

प्र. १. खालील पर्यायांतून योग्य पर्याय निवडून खूण करा.

‘मरीन ड्राईव्ह’ हे स्थळ कसे आहे?

  1. देखणे 2) आकर्षक 3) सुरेख 4) मनमोहक)

उत्तर: 3) सुरेख

समुद्र कसा आहे ?

 1) अनंत 2) अथांग 3) अजात 4) अक्षम्य

 उत्तर: 2) अथांग

शेकडो लोकांची मुंबई कोण आहे?

  1. देवता 2) पिता 3) माता 4) आई)

उत्तर: 4) आई

प्र. २. खालील प्रश्नांची उत्तरे एक-दोन शब्दांत लिहा.

क)  मरीन ड्राईव्ह’ला अजून काय म्हणतात ?

उत्तर: क्वीन्स नेकलेस

ख) हा समुद्रकिनारा किती किलोमीटर लांब आहे?

उत्तर: साडेतीन किलोमीटर

ग) दर्यामध्ये दूरवर काय दिसते ?

उत्तर: कोळ्यांच्या होड्या

घ) कोण कोणाला ओळखत नाही ?

उत्तर: शेकडो लोक

ङ) रम्य आठवणी कोठे नेता येतील ?

उत्तर: परतीच्या प्रवासात

प्र. ३. एका वाक्यात उत्तरे लिहा.

मुंबईत लोक कोठून येतात ?

उत्तर: मुंबईत लोक कुठूनही येतात.

समुद्राकडे कोण रोखून पाहतात ?

उत्तर: उंच इमारती, हॉटेल व बंगले समुद्राकडे जणू रोखून पाहतात.

मावळत्या सूर्याचे रंग पडल्यावर कसे दिसते ?

उत्तर: मावळत्या सूर्याचे रंग पडल्यावर ते सारे शोभून दिसतात.

घ) लोकांचा थकवा कोण घालवते ?

उत्तर: लांबून आलेले थंड खारे वारे लोकांचा थकवा घालवतात.

ङ) या ठिकाणी भेट दिल्यावर काय होईल ?

उत्तर: या ठिकाणी भेट दिल्यावर तुम्हीही इथल्या प्रेमात पडाल.

प्र. ४. थोडक्यात उत्तर लिहा.

कवी ‘मरीन ड्राईव्ह’ ला मुंबईची शान का म्हणत आहे?

उत्तर: मरीन ड्राईव्ह साडेतीन किलोमीटर लांबच लांब आहे आणि हे अतिशय सुरेख स्थळ आहे, ज्याला ‘क्वीन्स नेकलेस’ असेही म्हणतात. म्हणून कवी याला मुंबईची शान म्हणत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

पाठ 1: आजीबाईचा बटवा – स्वाध्यायपाठ 1: आजीबाईचा बटवा – स्वाध्याय

Spread the loveइयत्ता ५ वी – सप्तर्षी पाठ १ : आजीबाईचा बटवा – स्वाध्याय मौखिक कौशल्य (Speaking Skill) प्रश्न १) घरात कोण-कोण आहेत? उत्तर: घरात रिया, रोहन, आई आणि बाबा

पाठ ३: माकडा माकडा हुप्प ! स्वाध्यायपाठ ३: माकडा माकडा हुप्प ! स्वाध्याय

Spread the loveइयत्ता ५ वी सप्तर्षी मौखिक कौशल्य प्र.१) काकांना कशी मुले आवडायची ? उत्तर: बागेत हैदोस घालणारी मुले काकांना खूप आवडायची. प्र.२) काका त्रिशानला लाडाने काय म्हणायचे? उत्तर: काका

पाठ ४: सज्जनगड किल्ला (स्वाध्याय)पाठ ४: सज्जनगड किल्ला (स्वाध्याय)

Spread the loveइयत्ता ५ वी सप्तर्षी मौखिक कौशल्य प्र.१) पत्र कोणी लिहिले आहे? उत्तर: पत्र शिवमने लिहिले आहे. प्र.२) पत्र कोणाला लिहिले आहे? उत्तर: पत्र आई-बाबांना लिहिले आहे. प्र.३) पत्रात