शब्दार्थ
- दानशूर — दानी
- अफाट — अमर्याद
- सामर्थ्य — शक्ती
- क्रोध — राग
- रिवाज — पद्धत
- अभय — भयमुक्त
- अटळ — न टाळता येणारे
- नियती — नशीब
- प्रभाव — परिणाम
- सुकर — सोपे
- आयुष्य — जीवन
- धरणीकंप — भूकंप
- प्रजाहितदक्ष — प्रजेच्या हिताची काळजी घेणारा
एका वाक्यात उत्तरे लिहा
१. राजा परीक्षित कशासाठी प्रसिद्ध होता?
उत्तर: राजा परीक्षित प्रजाहितदक्ष आणि दानशूरपणासाठी प्रसिद्ध होता.
२. राजा परीक्षिताकडे काय होते?
उत्तर: राजा परीक्षिताकडे अफाट ज्ञान व सामर्थ्य होते.
३. ज्ञानामुळे राजा परीक्षित कसा बनला?
उत्तर: ज्ञानामुळे राजा परीक्षित अहंकारी व क्रोधी बनला.
४. राजा परीक्षित कोणाचे प्रवचन ऐकायचा?
उत्तर: राजा परीक्षित महर्षी शुकदेवांचे प्रवचन ऐकायचा.
५. राजा परीक्षिताला कशाची खात्री होती?
उत्तर: राजा परीक्षिताला खात्री होती की आपले संपूर्ण ज्ञान व सामर्थ्य भविष्यवाणी खोटी ठरवेल.
सविस्तर उत्तरे लिहा
१. राजा परीक्षिताच्या नातवाच्या जन्माच्या वेळेस राजज्योतिषांनी काय भविष्यवाणी केली?
उत्तर: राजज्योतिषांनी भविष्यवाणी केली की, “महाराज, आपला नातू सद्गुणांनी पूर्ण आहे. तो पराक्रमी आहे; परंतु त्याचे सुख तुम्हाला फक्त बारा वर्षे मिळणार आहे. राजकुमार बारा वर्षांचा झाल्यावर, त्यानंतरच्या दिवशी तक्षकाच्या दंशाने त्याचा मृत्यू अटळ आहे.”
२. सत्तिकाच्या मृत्यूच्या घटनेचे वर्णन करा.
उत्तर: राजा परीक्षिताला वाटले की आपला नातू सत्तिक आता बारा वर्षांचा होणार होता. राजा परीक्षिताने फतवा काढला की, सत्तिक शिकारीसाठी जंगलात जाणार नाही. थोडे दिवस गेल्यावर त्याने सांगितले की राजमहालाच्या बाहेरही सत्तिक जाणार नाही. जसे दिवस जाऊ लागले, तसे राजा परीक्षिताला आपल्या सामर्थ्याचा अधिकच गर्व वाटू लागला. त्याने सत्तिकाला महालातच कडेकोट बंदोबस्तात ठेवले.
३. राजा परीक्षिताला उद्देशून महर्षी शुकदेवांनी काय सांगितले?
उत्तर: महर्षी शुकदेव म्हणाले, “वेळ, काळ आपल्या हातात नसतो. चांगले कर्म केले तर आयुष्य सुकर होते.”
