Husharmulga.com इयत्ता ५ सप्तर्षी (मराठी)class 5 saptarshi ( Marathi) पाठ ४: सज्जनगड किल्ला (स्वाध्याय)

पाठ ४: सज्जनगड किल्ला (स्वाध्याय)

Spread the love

इयत्ता ५ वी सप्तर्षी

मौखिक कौशल्य

प्र.१) पत्र कोणी लिहिले आहे?

उत्तर: पत्र शिवमने लिहिले आहे.

प्र.२) पत्र कोणाला लिहिले आहे?

उत्तर: पत्र आई-बाबांना लिहिले आहे.

प्र.३) पत्रात कशाचे वर्णन आले आहे ?

उत्तर: पत्रात सज्जनगड किल्ल्याच्या ट्रेकींगचे वर्णन आले आहे.

उपयोजित लेखन

प्र. १. योग्य पर्याय निवडून खूण करा.

क) शिवम कोठे आहे?

1) सातारा 2) अलिबाग 3) कोल्हापूर 4) मुंबई

उत्तर: 1) सातारा

ख) शिवम कसले प्रशिक्षण घेत आहे?

1) पोलिसाचे 2) सैनिकी 3) एन.सी.सी.चे 4) नर्सिंगचे

उत्तर: 2) सैनिकी

ग) शिवम ट्रेकींगला कोठे गेला होता?

1) मंडण गड 2) विशाळ गड 3) राजगड 4) सज्जनगड

उत्तर: 4) सज्जनगड

प्र. २. एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.

सैनिकी प्रशिक्षण घेणारा कोण आहे ?

उत्तर: शिवम

ख) शिवमला जेवण कसे मिळते ?

उत्तर: सकस आणि पोटभर

ग) प्रशिक्षण केंद्राचे नियम कसे आहेत ?

उत्तर: खूप कडक

घ) सज्जनगड किल्ला कोणी बांधला ?

उत्तर: बहामनी शासकांनी

ङ) ट्रेकींगच्या मार्गावर हनुमंताच्या किती मुर्त्या आहेत ?

उत्तर: ११

प्र. ३. एका वाक्यात उत्तरे लिहा.

शिवमने आईला स्वतःच्या खाण्यापिण्याविषयी काय सांगितले?

उत्तर: शिवमने आईला सांगितले की खाण्यापिण्याची अजिबात काळजी करू नकोस, इथे वेळच्या वेळी सकस जेवण दिले जाते.

ख) बाबा शिवमला महाराष्ट्राविषयी काय सांगायचे ?

उत्तर: बाबा सांगायचे की महाराष्ट्र गड-किल्ल्यांनी समृद्ध आहे.

ग) आई शिवमला फिरण्याविषयी काय सांगायची ?

उत्तर: आई सांगायची की ‘केल्याने देशाटन शहाणपण येते’.

घ) घळ म्हणजे काय ?

उत्तर: घळ म्हणजे डोंगरातील गुहा (जसे रामघळ जिथे समर्थ रामदास ध्यान करायचे).

ङ) आई-बाबांना कसले आश्चर्य वाटले असणार ?

उत्तर: शिवम इतिहासात रस घेऊन हे सगळे सांगत आहे हे वाचून आई-बाबांना आश्चर्य वाटले असणार.

प्र. ४. थोडक्यात उत्तर लिहा.

सज्जनगडाचे वर्णन:

उत्तर: सज्जनगड किल्ला बहामनी शासकांनी बांधला. ट्रेक सुरू करताना हनुमानाची मूर्ती आहे आणि मार्गावर अशा ११ मूर्त्या आहेत ज्यांची स्थापना समर्थ रामदासांनी केली. मुख्य प्रवेशद्वार ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ आहे. किल्ल्यावर ‘घोडाळे’ तलाव, ‘रामघळ’, ‘ब्रह्मपिसा मंदिर’ आश्रम असून किल्ल्याची तटबंदी अजूनही शाबूत आहे.

भाषा विकास आणि व्याकरण

प्र. १. समानार्थी शब्द लिहा:

क) प्रशिक्षण – ज्ञानार्जन,

ख) घळ – गुहा,

ग) नियम – अटी,

 घ) शाबूत – बळकट,

ङ) प्रवेशद्वार – दरवाजा,

च) ज्ञान – चिंतन.

प्र. २. विरुद्धार्थी शब्द लिहा:

क) शाबूत x कमकुवत,

ख) सकस x कसहीन,

ग) मुख्य x गौण,

घ) आठवण x विसर,

ङ) काळजी x निष्काळजी,

च) रस x नीरस.

व्याकरण (काळ):

प्र. १ काळ ओळखा:

क) उद्या काय तो निर्णय कळेल. – भविष्यकाळ (Future Tense)

ख) प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. – वर्तमानकाळ (Present Tense)

 ग) मी अभ्यास केला. – भूतकाळ (Past Tense)

 घ) आम्ही जेवलो. – भूतकाळ (Past Tense)

 ङ) मी खूप खरेदी करणार. – भविष्यकाळ (Future Tense)

 च) प्रीती वाचन करते. – वर्तमानकाळ (Present Tense)

प्र. २. योग्य रकान्यात लिहा:

वर्तमानकाळ: खेळतो, करते, येतात, उगवतो.

भूतकाळ: उगवला, खेळला, केला.

भविष्यकाळ: देईन, येणार, कळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

पाठ 1: आजीबाईचा बटवा – स्वाध्यायपाठ 1: आजीबाईचा बटवा – स्वाध्याय

Spread the loveइयत्ता ५ वी – सप्तर्षी पाठ १ : आजीबाईचा बटवा – स्वाध्याय मौखिक कौशल्य (Speaking Skill) प्रश्न १) घरात कोण-कोण आहेत? उत्तर: घरात रिया, रोहन, आई आणि बाबा

पाठ २: मुंबईचा किनारा स्वाध्यायपाठ २: मुंबईचा किनारा स्वाध्याय

Spread the loveइयत्ता ५ वी सप्तर्षी पाठ २: मुंबईचा किनारा मौखिक कौशल्य प्र.१) मुंबईच्या किनाऱ्याचे नाव काय आहे? उत्तर: मुंबईच्या किनाऱ्याचे नाव ‘मरीन ड्राईव्ह’ आहे. प्र.२) वर आकाश कसे आहे

पाठ ३: माकडा माकडा हुप्प ! स्वाध्यायपाठ ३: माकडा माकडा हुप्प ! स्वाध्याय

Spread the loveइयत्ता ५ वी सप्तर्षी मौखिक कौशल्य प्र.१) काकांना कशी मुले आवडायची ? उत्तर: बागेत हैदोस घालणारी मुले काकांना खूप आवडायची. प्र.२) काका त्रिशानला लाडाने काय म्हणायचे? उत्तर: काका