इयत्ता ५ वी सप्तर्षी
मौखिक कौशल्य
प्र.१) काकांना कशी मुले आवडायची ?
उत्तर: बागेत हैदोस घालणारी मुले काकांना खूप आवडायची.
प्र.२) काका त्रिशानला लाडाने काय म्हणायचे?
उत्तर: काका त्रिशानला लाडाने ‘माकडोबा’ म्हणायचे.
प्र.३) त्रिशान रागाने कोठे बसला होता?
उत्तर: त्रिशान रागाने एका बाकड्याकडे बसला होता.
उपयोजित लेखन
प्र. १. खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडून खूण करा.
क) श्रीरंग काका मुलांचे कोण होते ?
गाणी काका 2) नाटक काका 3) गोष्टी काका 4) बडबडे काका
उत्तर: 3) गोष्टी काका
ख) त्रिशानला कोण चिडवत होते ?
1) शेजारी 2) आई-बाबा 3) मुले 4) दादा-ताई
उत्तर: 3) मुले
ग) हिमालयातील मोठ्या माकडांना काय म्हणतात ?
1) अस्वल 2) कपि 3) कोल्हा 4) वानर
उत्तर: 2) कपि
प्र. २. खालील प्रश्नांची उत्तरे एक-दोन शब्दांत लिहा.
बागेत चकरा मारणे हा श्रीरंग काकांचा काय होता ?
उत्तर: नेहमीचा शिरस्ता
ख) काकांनी सगळ्यांना त्रिशानबरोबर काय करायला सांगितले ?
उत्तर: हातमिळवणी
ग) माकडे आपले कोण होते ?
उत्तर: पूर्वज
घ) श्री हनुमान कसे आहेत ?
उत्तर: अमर
ङ) माकडाचे शरीर कसे असते ?
उत्तर: लवचीक
प्र. ३. एका वाक्यात उत्तरे लिहा.
क) त्रिशान कसा मुलगा होता?
उत्तर: त्रिशान सदा हसतमुख आणि सतत उड्या मारणारा, छोटासा आणि छान गोबऱ्या गालाचा मुलगा होता.
ख) त्रिशान काकांना चिडून काय म्हणाला ?
उत्तर: त्रिशान चिडून म्हणाला, “मला अजिबात माकडोबा म्हणू नका. सगळे आज मला चिडवत आहेत. मी काय माकड आहे का?”
श्रीरंग काकांनी मुलांना बोलावून काय समजावले ?
उत्तर: श्रीरंग काकांनी मुलांना समजावले की एखाद्याला खूप वाईट वाटेल इतके चिडवायचे नाही.
घ) काकांनी काय सांगितल्यावर मुले हसू लागली?
उत्तर: आपले पूर्वज हे माकडच होते मग आपण सगळेच तर माकड आहोत, असे सांगितल्यावर मुले हसू लागली.
ङ) हिमालयातील माकडाविषयी तिथल्या लोकांची काय श्रद्धा आहे?
उत्तर: तिथल्या लोकांची श्रद्धा आहे की कपि साक्षात श्री हनुमानच आहे.
प्र. ४. थोडक्यात उत्तर लिहा.
पाठाच्या आधारे ‘माकडाची वैशिष्ट्ये’ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर: माकड हा माणसाचे अनुकरण करणारा एकमेव प्राणी आहे. तो माणसासारखे केळे सोलून खातो. माकड अतिशय बुद्धिमान व समजूतदार प्राणी आहे. त्याचे शरीर लवचीक असते आणि त्याच्या शेपटीत हाता-पायाइतकीच ताकद असते.
भाषा विकास आणि व्याकरण
प्र. १. वाक्यात उपयोग करा:
क) शिरस्ता असणे: संध्याकाळी फिरायला जाणे हा माझा शिरस्ता आहे.
ख) हातमिळवणी करणे: भांडण विसरून राज आणि श्यामने हातमिळवणी केली.
ग) गालगुच्चा घेणे: लहान बाळाचा गोड चेहरा पाहून आईने त्याचा गालगुच्चा घेतला.
प्र. २. विशेषणे लिहा:
त्रिशान: हसतमुख, छोटासा, गोबऱ्या गालाचा
माकड: बुद्धिमान, समजूतदार, लवचीक
प्र. ३. विरामचिन्हे वापरा:
क) श्रीरंग काका बागेत ये-जा करत होते.
ख) मी, रोहन, करण, अद्विका, नूतन सगळेच खेळत होतो.
ग) वाह ! किती सुंदर फुले आहेत ही !
घ) तू रडतो आहेस की काय ?
ङ) काका त्रिशानला ‘माकडोबा’ म्हणायचे.
वचन बदला:
क) भाजी – भाज्या,
ख) घोंगडी – घोंगड्या,
ग) खांदा – खांदे,
घ) चोपडी – चोपड्या,
ङ) शिल्प – शिल्पे,
च) ओवी – ओव्या.
समानार्थी शब्द
क) वारा – पवन,
ख) शेत – शिवार,
ग) राग – क्रोध,
घ) आई – माता,
ङ) गाय – धेनू,
च) रस्ता – वाट.
(प्र.२): समानार्थी शब्दांच्या जोड्या
क) गीत – २) गाणे,
ख) खूण – ४) संकेत,
ग) मौज – ३) गंमत,
घ) संभव – ५) शक्य,
ङ) पद्धत – १) रीत.
(प्र.१): विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या
क) टणक – ५) मऊ,
ख) जमा – ३) खर्च,
ग) लाभ – ४) हानी,
घ) मित्र – २) शत्रू,
ङ) दूर – १) जवळ.
(प्र.२): विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा
क) अवघड x सोपे,
ख) सुंदर x कुरूप,
ग) पाप x पुण्य,
घ) लांब x जवळ,
ङ) ऊन x सावली,
च) सुरुवात x शेवट.
