पाठ ६: हव्यास इयत्ता ५ वी सप्तर्षी स्वाध्याय

मौखिक कौशल्य

प्र.१) राजा दानधर्म करताना काय करायचा?

उत्तर: राजा प्रत्येक वेळेस काही ना काही अट ठेवायचा.

प्र.२) राजाला कोणाला बघून आश्चर्य वाटले?

उत्तर: स्पर्धेत भाग घेणाऱ्या साधूला बघून राजाला आश्चर्य वाटले.

उपयोजित लेखन

प्र. १. योग्य पर्याय निवडून खूण करा.

राजाचा काय नियम होता ?

१ ) दान करताना अट ठेवायचा 2) दान करताना थोडेसे करायचा 3) दान करताना गरीब शोधायचा 4) दान करताना विचार करायचा

उत्तर: १) दान करताना अट ठेवायचा

ख) एकदा राजाने काय ठरवले ?

1) सोने दान करायचे 2) मुद्रा दान करायच्या 3) जमीन दान करायची 4) नाणी दान करायची

उत्तर: ३) जमीन दान करायची

ग) साधूने कधीपासून धावायला सुरुवात केली ?

1) पहाटेपासून 2) सूर्योदयापासून 3) सूर्यास्तापासून 4) सकाळपासून

उत्तर: २) सूर्योदयापासून

प्र. २. एका शब्दात उत्तरे लिहा.

राजा कसा होता ?

उत्तर: दानशूर

ख) राजा कोणत्या नगरीचा होता?

उत्तर: विजयनगरीचा

ग) जमिनीचा मालक होण्याची इच्छा कोणाला झाली?

उत्तर: साधूला

घ) साधूला काय कमी पडली असे वाटले?

उत्तर: वेळ

प्र. ३. एका वाक्यात उत्तरे लिहा.

राजाने जमीन मिळवण्याकरिता कोणती अट घातली?

उत्तर: सूर्यास्तापूर्वी जितके अंतर धावत जाऊन परत राजमहालात याल तितकी जमीन तुमची अशी अट राजाने घातली.

ख) साधूच्या मनात काय निर्माण झाला ?

उत्तर: साधूच्या मनात हव्यास निर्माण झाला.

ग) साधूला वेळेत पोहोचण्याची खात्री होती पण काय झाले ?

उत्तर: त्याचे पाय लटपटू लागले, अंगात त्राण नाही असे वाटू लागले आणि तो कोसळला.

घ) साधूला त्याची कोणती चूक समजली?

उत्तर: कोणत्याही गोष्टीचा हव्यास करायचा नाही हे साधूला समजले.

ङ) साधू शेवटी कोठे निघून गेला? का?

उत्तर: साधू मोहातून बाहेर पडायला अजून तपस्या करावी लागेल असे म्हणून जंगलाच्या दिशेने निघून गेला.

प्र. ४. थोडक्यात उत्तर लिहा.

राजा दानधर्म करताना अट घालत असे, त्यामागे राजाची कोणती भावना होती?

उत्तर: जरी राजा दान देत असला तरी ते लोकांनी कष्ट करूनच स्वीकारले पाहिजे जेणेकरून घेताना आणि देताना आनंद मिळाला पाहिजे, ही राजाची भावना होती.

भाषा विकास आणि व्याकरण

समानार्थी शब्द

(प्र.२): क) दानशूर – दानी,

 ख) तहान – तृष्णा,

ग) हव्यास – मोह,

घ) सूर्य – आदित्य,

ङ) भोवळ – चक्कर,

च) तपस्या – तप.

विरुद्धार्थी शब्द

(प्र.३): सूर्योदय x सूर्यास्त,

नोकर x मालक,

मागे x पुढे,

 सावली x ऊन,

जास्त x कमी,

अपूर्ण x संपूर्ण.

विरामचिन्हे (स्वाध्याय):

क) राजा म्हणाला, “कोण आहे रे तिकडे?”

ख) अरे वा ! छान चित्र आहे !

ग) आज माझ्याकडे रिमा, कमला, सविता आणि सोना येणार आहेत.

घ) आज मला खूप अभ्यास आहे.

ङ) टिळकांना लोकांनी ‘लोकमान्य’ ही पदवी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *