मौखिक कौशल्य
प्र.१) पहिल्यांदा पाण्यात काय टाकले असेल ?
उत्तर: पहिल्यांदा पाण्यात फांदी टाकली असेल.
प्र.२) किती सागर आहेत ?
उत्तर: सप्त सागर आहेत.
प्र.३) फार विचार कोण करतो ?
उत्तर: मनुष्यप्राणी फार विचार करतो.
उपयोजित लेखन
प्र. १. योग्य पर्याय निवडून खूण करा.
पहिल्यांदाच काय पार केले असेल ?
1) रस्ता 2) तलाव 3) नदी 4) कालवा)
उत्तर: ३) नदी
ख) धपकन् पाण्यात काय फेकली ?
1) बोट 2) मोळी 3) लाकडे 4) काठी)
उत्तर: २) मोळी
ग) हळूहळू माणूस कोठे पोहोचला ?
1) बोटीपर्यंत 2) गलबतापर्यंत 3) पाणबुडीपर्यंत
उत्तर: ४) शिडाच्या होडीपर्यंत
प्र. २. एका शब्दात उत्तरे लिहा.
फांदी पाण्यात टाकल्यावर काय झाले?
उत्तर: तरंगली
ख) नदी कोणी पार केली?
उत्तर: माणसाने (दोघांनी)
ग) प्रगती कोणी केली ?
उत्तर: माणसाने
घ) माणसांची वाहतूक कशातून सुरू केली ?
उत्तर: आगबोटीतून
ङ) पाणबुडीचे राज्य कोठे आहे?
उत्तर: पाण्याखाली
प्र. ३. एका वाक्यात उत्तरे लिहा.
तराफा कसा तयार केला?
उत्तर: फांद्या बांधून तराफा तयार केला.
ख) सगळ्यांच्या आनंदाला का पारावार राहिला नाही?
उत्तर: आधी एकाने मग दोघांनी नदी पार केली म्हणून आनंदाला पारावार राहिला नाही.
ग) वाऱ्याची दिशा कशामुळे बदलते?
उत्तर: माणसाने शिडाच्या होडीद्वारे वाऱ्याची दिशाही बदलली.
घ) कोठून सुरू केलेले काम कोठे येऊन पोहोचले?
उत्तर: फांदीने सुरू केलेले काम जहाजावर येऊन पोहोचले.
ङ) निसर्गाने मनुष्याला काय दिले?
उत्तर: निसर्गाने मनुष्याला प्रगतीच्या वाटा खुल्या करून दिल्या.
प्र. ४. थोडक्यात उत्तर लिहा.
‘फांदी ते जहाज’ हा प्रवास:
उत्तर: माणसाने पहिल्यांदा फांदी पाण्यात टाकली जी तरंगली, मग लाकडाची मोळी बांधली. पुढे फांद्या बांधून तराफा तयार केला आणि नदी पार केली. हळूहळू शिडाची होडी, आगबोट आणून माणसांची वाहतूक सुरू केली व शेवटी पाणबुडीने पाण्याखालीही राज्य वसवले.